बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्या ‘फितूर’ या चित्रपटाचे ‘पश्मिना’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. कतरिना कैफने पुन्हा एकदा तिच्या उत्कृष्ट नृत्यकलेचे प्रदर्शन या गाण्यात घडवले. ‘पश्मिना’ हे गाणे अमित त्रिवेदी यांनी गायले असून, गाण्यात कतरिनाने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे, तर दुसरीकडे आदित्य रॉय कपूरने कतरिनाला गाण्यात अभिनय करताना उत्तम साथ दिली.
अभिषेक कपूर ‘फितूर’ चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि चित्रपट चार्ल्स डिकन्स यांच्या ‘ग्रेट एक्स्पेक्टेशन’ या नॉव्हेलवर आधारित आहे. आदित्य आणि कतरिना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र अभिनय साकारताना दिसतील. चित्रपटात अभिनेत्री तब्बूने कतरिनाच्या आईची भूमिका साकारली आहे. १२ फ्रेब्रुवारी रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.