छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध खलनायिका म्हणून काम्या पंजाबीकडे पाहिले जाते.‘बिग बॉस ७’ ची विजेती असलेली काम्या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काम्या शलभ डांगसोबत लग्न करणार असून त्यांच्या घरी लग्नाची तयारी सुरु झाली आहे. त्यातच काम्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे.
काम्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून यात तिच्या लग्नपत्रिकेची झलक पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने “गणपती बाप्पा मोरया #ShubhMangalKaSha”असं कॅप्शन दिलं आहे. काम्या आणि शलभ १० फेब्रुवारी रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ही जोडी पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहे.
‘छपाक’ला धोबीपछाड; बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’चं राज्य
दरम्यान, ९ फेब्रुवारीला संगीत,मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर १० तारखेला लग्न आणि ११ तारखेला रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. हे रिसेप्शन दिल्लीमध्ये होणार आहे. काम्या आणि शलभ या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. काम्याने २००३ मध्ये व्यावसायिक बंटी नेगी याच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र त्याचं नातं फार काळ टिकलं नाही. २०१३ मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. काम्याला १० वर्षांची मुलगी आहे. तर शलभला देखील ११ वर्षांचा एक मुलगा आहे.