वेळेनुसार आपल्या दिसण्यात, व्यक्तिमत्त्वात इतके बदल होत जातात, की जुने फोटो पाहिल्यावर आपल्यालाच प्रश्न पडतो, की हा कोण आहे? असाच प्रश्न मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे याला पडला आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. सुबोधचा हा फोटो काही वर्षांपूर्वीचा आहे. हा फोटो पाहून सुबोधला प्रश्न पडला आहे, ‘अरे कोण आहे कोण हा? याला तर अनेक वर्षात पाहिला नाही मी.’
सुबोधच्या या फोटोवर चाहते भरभरून लाइक्स देत आहेत व कमेंट्स करत आहेत. काहींनी खूप मजेशीर उत्तरं दिली आहेत. ‘हा तर भावी पिढीचा महानायक.. नव्या युगाचे नटसम्राट’, अशा शब्दांत एकाने सुबोधचं कौतुक केलं. तर दुसऱ्याने म्हटलं, ‘एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व’. सुबोधच्या आगामी चित्रपटाचं नाव घेत एका युजरने लिहिलं, ‘लाखोंची मनं जिंकलेला विजेता’.
अरे कोण आहे कोण हा?
याला तर अनेक वर्षात पहिला नाही मी pic.twitter.com/J2KmyCvAoV— सुबोध भावे (@subodhbhave) March 8, 2020
आणखी वाचा : ‘हा’ आहे बॉलिवूडचा सर्वांत महागडा अभिनेता; एका जाहिरातीसाठी घेतो इतके कोटी रुपये मानधन
सुबोध लवकरच ‘विजेता’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुभाष घई या चित्रपटाचे निर्माते असून यामध्ये सुबोधसोबतच पूजा सावंत, पूजा बिष्ट, माधव देवचके, सुशांत शेलार व देवेंद्र चौघुले यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नेहमीप्रमाणेच सुबोध या चित्रपटातून कोणती भन्नाट व्यक्तिरेखा साकारणार हे पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘विजेता’ येत्या १२ मार्चला प्रदर्शित होणार आहे.