‘माझ्या व्यवसायावर लाथ मारु नकोस’, गुलशन ग्रोवर धोनीवर संतापले

गुलशन ग्रोवर यांनी धोनीचा फोटो शेअर करत केलेले ट्वीट चर्चेत आहे.

ms dhoni new look, ms dhoni, gulshan grover ms dhoni new look bollywood, Gulshan Grover, bollywood news, Bad man,
महेंद्रसिंह धोनीचा नव्या लूकमधील फोटो शेअर करत त्यांनी ट्वीट केले आहे.

बॉलिवूडमध्ये ‘बॅड मॅन’ म्हणून अभिनेते गुलशन ग्रोवर ओळखले जातात. ते त्यांच्या चित्रपटांसोबतच सोशल मीडिया पोस्टमुळे सतत चर्चेत असतात. गुलशन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते बिनधास्तपणे त्यांचे मत मांडताना दिसतात. आता गुलशन ग्रोवर यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा नव्या लूकमधील फोटो शेअर करत केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी कॅप्टन कूल धोनीने नव्या लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याने केलेली नवी हेअरस्टाइल चर्चेचा विषय ठरली होती. धोनी या लूकमध्ये अधिकच तरुण दिसत आहे. धोनीच्या या नवीन लूकचे फोटो हेअरस्टाइलिस्ट अलीम हकीमने शेअर केले आहेत. गुलशन ग्रोवर यांनी धोनीचा हेच फोटो शेअर करत ट्वीट केले आहे.

आणखी वाचा : नवाजुद्दीन सिद्दीकीचे कुटुंबीय सोडणार भारत; पत्नीने सांगितले कारण

‘माही खूप छान लूक आहे. कृपया डॉनच्या भूमिकेसाठी ऑफर आली तर ती स्विकारु नकोस. माझ्या व्यवसायावर लाथ मारु नकोस. पहिलेच माझे तिन भाऊ संजय दत्त, सुनली शेट्टी आणि जॅकी श्रॉफ ते करत आहेत जेणेकरुन मी बाहेर पडावे. आलिम हाकिम तुझ्याकडे बॅड मॅन येत आहे’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

गुलशन ग्रोवर यांचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने ‘बॅडमॅन नेहमी एक चांगला बॅड म्हणून ओळखला जातो’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘आदरणीय गुलशन ग्रोवर सर, तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही. प्रत्येक काळात वेगवेगळे डॉन येऊ शकतात पण बॅडमॅन केवळ एकच असू शकतो’ असे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gulshan grover is threatened by ms dhoni new look and said mere dhande par laat mat maro avb

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी