दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे आयुष्मान खुराना. तो आज त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. आयुष्मानने सिनेसृष्टीत ‘विक्की डोनर’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्याने दमदार अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपटात उत्तम भूमिका साकारल्या आहेत. कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असणारा आयुष्मान अनेकदा त्याच्या जीवनात घडणाऱ्या लहान-लहान गोष्टीदेखील चाहत्यांसोबत शेअर करत असतो. कलाविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून आयुष्मान-ताहिराकडे पाहिलं जातं. कॉलेजजीवनापासून एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या जोडीने काही वर्ष डेट केल्यानंतर लग्नगाठ बांधली. मात्र त्यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयुष्मान १२ वीला असताना एका क्लासमध्ये शिकत होता. त्यावेळी फिजिक्सच्या कोचिंग क्लासदरम्यान त्याची ताहिराशी ओळख झाली. आयुष्मान आणि ताहिराची लव्हस्टोरी फिजिक्सच्या कोचिंग क्लासपासून सुरु झाली. त्यावेळी ते दोघेही अकरावी-बारावीला होते. त्यावेळी माझे वडील एका वृत्तापत्रात कामाला होते आणि त्याच वृत्तपत्रामध्ये ताहिराचे वडील राजन कश्यपही काम करायचे. त्यामुळे माझे वडील आणि ताहिराचे वडील एकमेकांना फार ओळखायचे. ते एकमेकांचे मित्रच होते. तर दुसरीकडे आयुष्मान आणि ताहिरा हे देखील क्लासमुळे एकमेकांना ओळखायचे.

एकेदिवशी माझे वडील आणि राजन कश्यप या दोघांनी रात्री जेवणाचा कौटुंबिक प्लॅन बनवला. त्यावेळी आयुष्मान-ताहिरा यांना काहीही माहिती नव्हती. त्यामुळे ते दोघेही एकमेकांना त्या ठिकाणी बघून चकित झाले.

या दरम्यान आयुष्मानने तिच्या वडिलांसोबत ‘हमे तुमसे प्यार कितना’ हे गाणे गायले आणि त्यानंतर ताहिराही आयुष्मानच्या प्रेमात पडली. त्यानंतर पुढे आयुष्मान-ताहिराचे प्रेम वाढतच गेले. विशेष म्हणजे त्या दोघांनी चंदीगडमध्ये एकत्र थिएटरमध्ये काम केले आहे.

कॉलेजजीवनापासून एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या जोडीने काही वर्ष डेट केल्यानंतर २००८ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक उतार-चढाव आले. आता त्या दोघांचेही वैवाहिक जीवन खूप आनंदी आहे.  या दोघांच्या लग्नाला आता बरीच वर्ष उलटून गेली असून त्यांना विराजवीर आणि वरुष्का ही दोन मुलंदेखील आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday ayushmann khurrana his love story with tahira kashyap during collage days nrp