तुम्हाला हर्मन बवेजा आठवतोय का? हर्मनला प्रेक्षक एक अभिनेता म्हणून कमी आणि हृतिकसारखा दिसणारा हिरो म्हणून अधिक ओळखतात. हर्मनने ‘लव्ह स्टोरी २०५०’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात त्याच्यासोबत प्रियांका चोप्राही होती. खरं तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. मात्र प्रियांका आणि त्याची लव्ह स्टोरी चांगलीच गाजली. परंतु हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर हर्मनने याविषयीचं मौन सोडलं असून ब्रेकअप करण्यामागचं कारण सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका मुलाखतीमध्ये हर्मनने प्रियांका आणि त्याच्या नात्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. “त्यावेळी माझे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत होते त्यामुळे माझ्यावर प्रचंड प्रेशर येत होतं त्यामुळे मला माझं सारं लक्ष चित्रपटांवर केंद्रीत करायचं होतं. या साऱ्या गडबडीमध्ये मला प्रियांकालादेखील वेळ देण्यास जमत नव्हतं”, असं हर्मनने सांगितलं.

पुढे तो म्हणतो, “लव्ह स्टोरी २०५०’ अपयशी ठरल्यानंतर मला ‘वॉट्स युआर राशी’ या चित्रपटाकडे विशेष लक्ष द्यायचं होतं. या चित्रपटात माझी महत्त्वाची भूमिका होती. त्यातच चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनीही मला चित्रपटावर लक्ष केंदीत करण्यास सांगितलं होतं. प्रियांका मला त्यावेळी सतत वेळ देण्यास सांगत होती. मात्र मला त्यावेळी ते शक्य नव्हतं. त्यामुळेच आमच्या नात्यात दुरावा आला”.

दरम्यान, हर्मनने ‘व्हॉट्स युवर राशी’ आणि ‘व्हिक्ट्री’सारखे सिनेमे केले. पण हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणदणीत आपटले होते. त्यामुळे त्याचं सिनेकरिअर हे तीन सिनेमांपूरतच मर्यादीत राहीलं. त्यानंतर हर्मन फारसा कुठेच दिसला नाही. २०१४ मध्ये त्याने ‘ढिश्कियाव’ या सिनेमातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण बहुधा बॉलिवूड हे त्याचं क्षेत्र नसावं. हा सिनेमाही फार चालला नव्हता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harman baweja affair and breakup with priyanka chopra ssj