छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिमांशी खुरानाने करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. हिमांशीचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले असून तिने सोशल मीडियावर याविषयीची माहिती दिली आहे. २९ सप्टेंबरला हिमांशीला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

करोनावर मात केल्यानंतर हिमांशीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर घरी आल्यावर हिमांशीने तिचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सोबतच एक फोटोदेखील शेअर केला आहे.

“मी करोनामुक्त झाले आहे. माझे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. मी सगळी योग्य खबरदारी बाळगली होती. तुम्हाला माहितच असेल अलिकडेच मी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळेच चित्रीकरणासाठी सेटवर जाण्यापूर्वी करोना चाचणी करुन घ्यावी असं मी ठरवलं. त्यानुसार, चाचणी केली आणि माझे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी करोना चाचणी करुन घ्या”, असं म्हणत हिमांशीने तिला करोना झाल्याची माहिती दिली होती. मात्र, आता करोना निगेटिव्ह आल्यानंतरही तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, हिमांशी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तसंच ती प्रसिद्ध पंजाबी मॉडेल-गायकादेखील आहे. बिग बॉस १३’मुळे हिमांशी खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली.