बॉलिवूड अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन झाले आहे. आज २० एप्रिल रोजी मुंबईतील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे हिना खानच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. ‘अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन झाले आहे. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे’ अशी माहिती विरल भय्यानीने दिली आहे.

अनेक कलाकारांनी विरलच्या या पोस्टवर कमेंट करत हिनाच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. हिना सध्या कामानिमित्त बाहेर गेली असून ती लवकरात लवकर घरी परत येण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे.

हिना बऱ्याच वेळा तिच्या वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. ती काही दिवसांपूर्वी आई-वडिलांसोबत मालदिवला सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली होती. तिने तेथील वडिलांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.