बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशनशी काडीमोड घेतल्यानंतर सुझान खानने आता पुनर्विवाह तयारी केल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे सुझान आणि ऋतिक यांच्या घटस्फोटास कारणीभूत ठरलेल्या ऋतिकच्या जवळच्या मित्रासोबत सुझान विवाहबद्ध होणार असल्याचे समजते. मात्र, त्या मित्राचे नाव अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. यापूर्वी सुझानचे बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे बोलले जात होते. पण अर्जुन रामपालने हे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले होते. तर, सुझानसोबतच्या घटस्फोटानंतर ऋतिक आणि बॉलीवूडची ‘क्वीन’ कंगना रणावत यांच्यात जवळीक निर्माण झाल्याचीही चर्चा बॉलीवूड वर्तुळात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, हृतिक आणि सुझान यांनी डिसेंबर २०१३ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी मे २०१४ मध्ये घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. अखेर न्यायालयाने नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांच्या काडीमोडास परवानगी दिली आणि त्यांचे १३ वर्षांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan ex wife sussanne khan all set to marry again