scorecardresearch

हृतिक रोशन

हृतिक रोशन हा बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता आहे. त्याचा जन्म १० जानेवारी १९७४ रोजी मुंबईमध्ये झाला. त्याचे संपूर्ण नाव हृतिक रोशन नागरथ असे आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब चित्रपट व्यवसायामध्ये कार्यरत आहे. त्याने माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूल या शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. शाळेत डाव्या हातामध्ये असलेल्या अतिरिक्त अंगठ्यामुळे त्याला चिडवले जात आहे. यामुळे तो शाळेत जाणे टाळायचा. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत तो बोलताना अडखळायचा. हळूहळू त्याने या समस्यांवर मात केली. याच सुमारास हृतिकने त्याच्या आजोबांच्या म्हणजेच ओम प्रकाश यांच्या ‘आशा’ या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. १९८० पासून त्याचा बॉलिवूडमधील प्रवास सुरु झाला. कॉलेजमध्ये असताना हृतिकने त्याच्या वडिलांच्या (राकेश रोशन) करन-अर्जुन, कोयला अशा काही चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शन केले. २००० मध्ये राकेश रोशन यांनी हृतिक आणि अमीशा पटेल ही फ्रेश जोडी घेऊन ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट बनवला. या चित्रपटामुळे हृतिक रातोरात स्टार झाला. त्याच्या या चित्रपटाने अनेक विक्रम मोडत इतिहास रचला. ‘कहो ना प्यार है’ च्या यशानंतर त्याला निर्मात्यांच्या ऑफर्स येऊ लागल्या. पुढील काही वर्षांमध्ये प्रदर्शित झालेले त्याचे चित्रपट फ्लॉप झाले. चुकीची संहिता निवडल्याने चित्रपट फ्लॉप असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने तो चित्रपट करताना खूप विचार करु लागला. २००६ मध्ये ‘कोई मिल गया’ या चित्रपटामुळे त्याला पुन्हा एकदा यश गवसले. त्याने ‘धूम २’, ‘जोधा अकबर’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘क्रिश’, ‘अग्निपथ’, ‘वॉर’ अशा मोजक्या पण दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००० मध्ये त्याने सुझान खानशी लग्न केले. त्यांना दोन मुलगे आहेत. नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. हृतिक सध्या सबा आझाद या अभिनेत्रीला डेट करत आहे.Read More
gd-bakshi-fighter
‘फायटर’ चित्रपट पाहून मेजर जनरल जीडी बक्षी यांनी दिली प्रतिक्रिया; हृतिक रोशनला टॅग करत म्हणाले…

केवळ जीडी बक्षीच नव्हे तर भारतीय वायूसेनेच्या सर्वच अधिकाऱ्यांनी हा चित्रपट पाहून याचे कौतुक केले आहे

Hrithik Roshan Deepika Padukone Kissing Scene In Uniform
हृतिक रोशन-दीपिका पदुकोणच्या किसिंग सीनमुळे ‘फायटर’ अडचणीत, वायुसेनेच्या अधिकाऱ्याकडून निर्मात्यांना नोटीस

‘फायटर’ चित्रपटातील त्या किसिंग सीनमुळे गणवेशाचा अनादर झाल्याचा ठपका

Fighter box office collection day 10 Hrithik Roshan film in India now stands at 162.75 crore
हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटाच्या कलेक्शनध्ये मोठी वाढ, शनिवारी केली जबरदस्त कमाई

Fighter box office collection day 10: जागतिक स्तरावर हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटाचा धुमाकूळ, आतापर्यंत ‘इतक्या’ कोटींचा केला व्यवसाय

fighter-loss
हृतिक रोशनच्या ‘फायटर’चं ८० कोटींचं नुकसान; जाणून घ्या नेमकं कारण

सिद्धार्थ आनंद यांच्या ‘वॉर’ आणि ‘पठाण’च्या तुलनेत या चित्रपटाची कमाई कमी झाली आहे, पण एकंदर हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीस…

Fighter box office collection Day 1
‘फायटर’ ची दमदार सुरुवात, हृतिक रोशन-दीपिका पदुकोणच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

Fighter box office collection Day 1 : ‘फायटर’ च्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी आली समोर

hrithik-roshan-anil-kapoor
“गेली चार दशकं…” ‘फायटर’च्या प्रमोशनदरम्यान हृतिकचे वक्तव्य ऐकताच अनिल कपूर यांना अश्रु अनावर

या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदूकोण व अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका व हृतिक ही…

Shah rukh khan review fighter movie trailer sidhharth anand hrithik roshan deepika padukon bollywood news
हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटाच्या ट्रेलरची शाहरुख खानला भुरळ; म्हणाला, “खलनायकाचा लूक अन्…”

‘पठाण’च्या यशामुळे फायटरकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Hrithik Roshan hid identity first photo shoot Dabboo Ratnani fighter movie release Fighter movie Deepika Padukone Hrithik Roshan
पहिल्या फोटोशूटला हृतिक रोशनने लपवली होती आपली ओळख; प्रसिद्ध फोटोग्राफरचा खुलासा

फोटोंचे कौतुक करण्यासाठी फोटोग्राफरला जेव्हा राकेश रोशन यांचा फोन आला तेव्हा त्याला समजले की, हृतिक हा त्यांचा मुलगा आहे.

Fighter advance booking Deepika Padukone Hrithik Roshan Fighter earned, 2 crores before release bollywood news
‘फायटर’ची प्रदर्शनापूर्वीच मोठी कमाई, आगाऊ बुकिंगमधून कमावले तब्बल ‘इतके’ कोटी; ८६,५१६ तिकिटांची झाली विक्री

‘फायटर’ हा चित्रपट हवाई दलावर आधारित असून, तो प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रीलिज करण्यात येणार आहे.

fighter banned in gulf countries
इंटिमेट सीनपासून ते आक्षेपार्ह शब्दांपर्यत, हृतिक रोशन व दीपिका पदुकोणच्या ‘फायटर’ चित्रपटात केले ‘हे’ मोठे बदल

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ चित्रपटात कोणते मोठे बदल केले? जाणून घ्या…

fighter trailer out hrithik roshan deepika padukone
Fighter Trailer : देशभक्ती, पुलवामा हल्ला अन्…; हृतिक व दीपिकाच्या बहुचर्चित ‘फायटर’चा ट्रेलर प्रदर्शित

Fighter Trailer Out :हृतिक रोशन, दीपिका पदुकोण व अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘फायटर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×