तरूणींच्या मनावर राज्य करणारा अभिनेता हृतिक रोशनचा आज वाढदिवस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हृतिकच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या आहेत. तर हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी आणि इंटेरिअर डिझायनर सुझान खानने एक व्हिडीओ शेअर करत हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हा व्हिडीओ सुझान खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत हृतिक आणि त्याची दोन्ही मुलं दिसत आहेत. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रेय. तुझ्या आयुष्यात सर्वात सुंदर आणि आनंदी दिवस येवोत आणि २०२१ हे वर्ष खूप चांगलं जावो अशी प्रार्थना करते”, अशा आशयाचं कॅप्शन सुझानने दिलं आहे. व्हिडीओला हॅशटॅग देते सुझानने हृतिकला ‘बेस्ट डॅड इन द वर्ल्ड’ म्हटलं आहे.

आणखी वाचा : करीनामुळे ‘आदिपुरूष’चे चित्रीकरण लांबणीवर?

हृतिक आणि सुझानने २०१४ मध्ये घटस्फोट घेतला होता. मात्र घटस्फोटानंतरही या दोघांमधली मैत्री कायम चर्चेत राहिली आहे. लॉकडाउनदरम्यान सुझान हृतिकच्या घरी राहायला आली होती. आपल्या दोन्ही मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सुझानने सांगितलं आणि तिच्या या निर्णयाचं हृतिकने मनापासून स्वागत केलं.