महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशाखा सुभेदार, समीर चौगुले,प्रभाकर मोरे आणि रसिका वेंगुर्लेकर ही दिग्गज कलाकार मंडळी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अलिकडेच या कलाकारांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना ‘आमचं आमच्या मातृभाषेवर प्रेम असून मातृभाषेत काम करण्याचा अभिमान आणि समाधान वाटतं’, अशी भावना या कलाकारांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, कोणत्याही क्षेत्रात किंवा भाषेत काम करणं हे चुकीचं नसून मातृभाषेत काम करण्याचा आनंद काही वेगळाच असतो असं समीर चौगुलेंनी सांगितलं.  तसंच या चारही कलाकारांनी त्यांच्या करिअरमधील अनेक रंजक किस्सेदेखील यावेळी शेअर केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I feel satisfied working in my mother tongue sameer and vishakha ssj