काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये ते दोघेही न्यूयॉर्कच्या रस्त्यावर धुम्रपान करताना दिसले होते. हे फोटो पाहून अनेकांनीच त्याविषयी विविध तर्क लावण्यास सुरुवात केली होती. किंबहुना या फोटोंमुळे दोन्ही कलाकारांवर टीकेची झोडही उठवण्यात आली होती. त्यात माहिरावर टीका करणाऱ्यांची संख्या जास्त होती. माहिराने धुम्रपान केल्यामुळे आणि तोकडे कपडे घातल्यामुळे तिला अनेकांच्या रागाचा सामना करावा लागला होता. या सर्व प्रकरणावर आता माहिरा पहिल्यांदा मोकळेपणे व्यक्त झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सुरुवातीला मी गप्पच राहणं पसंत केलं होतं. जे खासगी होतं, ते सर्व सार्वजनिक झालं, म्हणून मला बोलणं भाग होतं. एखाद्याच्या खासगी मुद्द्यावर इतकी चर्चा होणे, टीका होणे कोणासाठीच चांगलं नाही,’ असं तिने ‘खलिज टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

वाचा : वादांचा ‘घुमर’ टाळण्यासाठी श्रेयाने काढली पळवाट

पुढे ती म्हणाली की, ‘पुढाकार घेण्यासाठी हिंमतीची गरज असते. काही गोष्टींचा तुम्हाला अपरिहार्यपणे सामना करावाच लागतो. जेव्हा तुम्ही धाडसाने सामोरं जाता, तेव्हा तुम्ही अधिक सक्षम होता. मी कोण आहे हे, खऱ्या अर्थाने मला त्या काळात समजलं.’ जेव्हा माहिरावर टीकांचा भडीमार होत होता त्यावेळी बऱ्याच कलाकारांनी तिला पाठिंबा दिला होता. खुद्द रणबीरही तिच्या बचावासाठी धावला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I responded on trolls because something very personal became public says mahira khan on photos with ranbir kapoor