पाच वेळा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन राहणा-या मेरी कोमची आगामी चित्रपटात भूमिका करणा-या प्रियांका चोप्राच्या जीवनचा काही भाग या महान खेळाडूसारखाच होता, असे तिचे म्हणणे आहे.
प्रियांका म्हणाली की, मेरीच्या जीवनाची कथा माझ्या जीवनाच्या कथेसारखीच आहे. मी जेव्हा चित्रपटसृष्टीत आले होते तेव्हा मी सुद्धा संघर्ष केला आणि मी एकटी बसून रडलेदेखील होते. खरं पाहायला गेले तर स्वप्न पाहणा-या प्रत्येक मुलीची हीच कथा आहे. मेरी कोम चित्रपटात मणिपूरमधील भूमिहीन शेतक-याच्या घरात जन्माला आलेल्या मेरीच्या परीक्षांची आणि दुःखाची कथा सांगितली आहे. जिने एका मुष्ठियोद्धाच्या (बॉक्सर) रुपात नावलौकिक कमविले आहे.
भारतात महिला खेळाडूंच्या जीवनावर अद्याप चित्रपट बनविण्यात आलेले नाहीत. मला ख-या मेरी कोमची कथा ऐकवायची आहे. मेरी ही मुष्ठियोद्धा असण्याबरोबरच एक सामान्य मुलगीसुद्धा आहे. जी तिच्या बॉक्सिंग ग्लोव्हजमध्ये दडलेल्या नखांना नेल पॉलिश लावते, असे प्रियांका म्हणाली. तसेच, इतर मुलींप्रमाणेच मेरीला गाणे गाणे, चित्रपट पाहणे आणि इतर गोष्टी आवडतात, असेही ती म्हणाली. यावेळी मेरी कोमसुद्धा तिथे उपस्थित होती.
मेरी म्हणाली की, दिल्ली तसेच देशातील अन्य भागात पूर्वेकडील मुलींशी नेपाळी किंवा गैर-भारतीयांसारखा व्यवहार केला जातो. मणिपूरमधली स्थिती भयानक होत चालली आहे. मला सुरक्षारक्षकांविना बाहेर जाण्यास भीती वाटते. विभागातील पोलिसांनी मला सुरक्षा दिलेली आहे. नाहीतर केवळ मीच नाही तर माझे कुटुंबही सुरक्षित राहिले नसते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Nov 2013 रोजी प्रकाशित
मी पण एकटी रडले होते – प्रियांका चोप्रा
पाच वेळा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन राहणा-या मेरी कोमची आगामी चित्रपटात भूमिका करणा-या प्रियांका चोप्राच्या जीवनचा काही भाग या महान खेळाडूसारखाच होता
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 11-11-2013 at 03:38 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I share the same story as mary kom priyanka chopra