बॉलिवूडने जे महत्वाचे बदल अनुभवले आहेत त्यात इरफान खानसारख्या अष्टपैलू अभिनेत्याचा अतुल्य वाटा आहे. योग्य चित्रपटाची निवड आणि दमदार भूमिकांची जाण असलेला इरफान खान हा अभिनेता म्हणजे अभिनयाची खाण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इरफानचा अभिनय असलेले चित्रपट नेहमीच चर्चेत असतात. ‘तलवार’ या त्याच्या आगामी चित्रपटाने इरफानच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. ‘तलवार’मध्ये तो एका प्रकरणाचा शोध घेणाऱ्या अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून, चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरला मिळत असलेला प्रतिसाद पाहून इरफान सुखावला आहे. १४ वर्षीय आरुशी तलवार आणि घरगडी हेमराज बांजड यांचे तथाकथित प्रेम आणि खून प्रकरण या सत्यघटनेवर ‘तलवार’ चित्रपट आधारित आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात कोंकणा सेन शर्मा, तब्बू आणि सोहम शहा यांचासुद्धा अभिनय पाहायला मिळणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2015 रोजी प्रकाशित
‘तलवार’वरील प्रेक्षकांच्या प्रतिसादाने इरफान सुखावला
बॉलिवूडने जे महत्वाचे बदल अनुभवले आहेत त्यात इरफान खानसारख्या अष्टपैलू अभिनेत्याचा अतुल्य वाटा आहे. योग्य चित्रपटाची निवड आणि दमदार भूमिकांची जाण असलेला इरफान खान हा अभिनेता म्हणजे अभिनयाची खाण आहे...

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 24-08-2015 at 04:59 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irrfan khan pleased with audiences reactions to talvar