बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चत असते. कधी ती चित्रपटांमधील भूमिकांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे अनुष्का चर्चेत असते. आता सध्या अनुष्काचा भाऊ चर्चेत आहे. लाइमलाइटपासून लांब असणारा अनुष्काचा भाऊ कर्णेश शर्मा एका अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याचे म्हटले जात आहे. त्या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
निर्माता कर्णेश शर्मा हा अभिनेत्री तृप्ती डिमरीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तृप्तीने ‘बुलबुल’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाची निर्मिती कर्णेशच्या होम प्रोडक्शनने केले होती. त्या दोघांची ओळख या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. आता ते दोघेही सोशल मीडियावर एकत्र वेळ घालवतानाचे फोटो शेअर करताना दिसतात. त्यामुळे कर्णेश तृप्तीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
आणखी वाचा : ‘शाहरुखसोबत बीडी शेअर करायचो’, मनोज वाजपेयीने सांगितला किस्सा
आणखी वाचा : पुणे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकू हल्ला
कर्णेश आणि तृप्तीला त्यांच्या रिलेशनबद्दल बऱ्याच वेळा विचारण्यात आले आहे. मात्र त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पण काही दिवसांपूर्वी अनुष्काने इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला शेअर केलेल्या फोटोमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या फोटोमध्ये अनुष्कासोबत कर्णेश आणि तृप्ती दिसत होते.
तृप्तीने २०१७ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती अभिनेता श्रेयस तळपदेसोबत ‘पोस्टर बॉइज’ या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर तिने ‘लैला मजनू’ चित्रपटात काम केले. आता लवकरच तृप्ती ‘अॅनिमल’ आणि ‘काला’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.