अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चर्चा इव्हांकाने ताजमहल पाहताना केलेल्या फोटोशूट मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे सुरु झाल्या आहेत. यातील काही फोटो एडिट केल्यामुळे तिच्यासोबत प्रसिद्ध पंजाबी सिंगर आणि अभिनेता दिलजीत दोसांझ दिसला तर काही फोटोंमध्ये बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी इव्हांकासोबत दिसला.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी इव्हांकाच्या या फोटोशूटचे भन्नाट मीम्स तयार केले आहेत. यामध्ये ती कोणाच्या तरी सायकलवर डबल सीट बसल्याचे दिसत आहे तर एका फोटोमध्ये बैलगाडीत मागे बसली आहे. फोटोशॉप करुन तयार केलेले हे फोटो इव्हांकाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

इव्हांकाने ट्विटरवर तिचे मीम्स शेअर करत भारतीय लोकांकडून मिळालेल्या प्रेमाचे आभार मानले आहेत. तसेच मी अनेक नवीन मित्र बनवले असे ती म्हणाली आहे.