बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणजे जॅकी श्रॉफ. त्यांचे लाखो चाहते आहेत. नुकताच जॅकी श्रॉफ यांनी रिअॅलिटी शो ‘डान्स दीवाने ३’मध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी पत्नी आयशा श्रॉफ यांच्याविषयी एक किस्सा सांगितला. आयशाने जॅकी श्रॉफ आणि त्यांच्या मित्रांना एकदा गुंडांपासून वाचवले होते.

‘डान्स दीवाने ३’च्या एका भागामध्ये जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांनी हजेरी लावली. दरम्यान शोचा सूत्रसंचालक राघव जुयालने जॅकी आणि सुनील यांना ‘तुम्ही तुमच्या पत्नीला घाबरता का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत जॅकी श्रॉफ यांनी म्हटले की हो जेव्हा पासून आयशाने गुंडांना मारहाण केली तेव्हा पासून मी तिला घाबरतो.

आणखी वाचा : सत्यनारायण की कथा: भावना दुखावू नयेत म्हणून सिनेमाचं नाव बदलणार!

झूमने दिलेल्या वृत्तानुसार, जॅकी श्रॉफ म्हणाले की, ‘माझे नाव केवळ भिडू आहे. मी आयशाला नेहमी घाबरतो. आजच नाही तर पहिल्यापासूनच. ती माझ्यासमोर Nepeansea रस्त्यावर गुडांना मारहाण करत होती. तेही मित्रांसाठी. माझे आणि एका मित्राचे भांडण झाले होते. तेव्हा तेथे काही गुंडे आम्हाला मारण्यासाठी आले. तेव्हा तिने माझ्यासमोर त्या गुडांना मारले. तेव्हापासून मी तिला घाबरतो.’

आयशा आणि जॅकी श्रॉफ यांची ओळख आयशा १३ वर्षांच्या असताना झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते होते. १९८७ साली त्यांनी लग्न केले. आज आयशा आणि जॅकी श्रॉफ यांना दोन मुले आहेत. टायगर आणि कृष्णा श्रॉफ.