चित्रपट प्रदर्शनापूर्वीच नावारुपाला आलेली नवोदित अभिनेत्री जान्हवी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. जान्हवी तिच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक लहानसहान गोष्टी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतं. काही दिवसापूर्वीच तिने ‘धडक’मधील तिचा सहअभिनेता इशान खट्टर याच्याबरोबरचा सैराट या गाण्यावरील एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओ कमी कालावधीत वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला होता. या व्हिडिओप्रमाणेच जान्हवीचे अन्य काही फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होत असतात.मात्र तरीदेखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरील या साऱ्या पोस्ट डिलीट केल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जान्हवीचा आगामी चित्रपट येत्या २० जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. त्यामुळे सध्या जान्हवी या चित्रपचटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यस्त असून ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘धडक’चा मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीसाठी तिच्या नावाची घोषणा केल्यानंतर जान्हवीने आनंद व्यक्त करण्यासाठी प्रथम इन्स्टाग्रामवर ही गोष्ट शेअर केली होती. मात्र या पोस्ट शेअर करण्यापूर्वी तिने तिच्या जुन्या आठवणी इन्स्टावरुन हटविल्या होत्या. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये तीने हा खुलासा केला आहे.

‘चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी माझं इन्स्टाचं अकाऊंट खासगी होतं. मात्र चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मला माझं खातं चाहत्यांसाठी खुलं अर्थात पब्लिक करावं लागलं. खातं पब्लिक केल्यानंतर माझे अनेक चाहते माझ्या पोस्ट पाहू शकणार होते. त्यातील काही पोस्ट या माझ्या वैयक्तिक आणि मित्रपरिवार यांच्याबरोबर शेअर करण्यासारख्या होत्या. त्यामुळे चाहत्यांना केवळ माझा चित्रपट किंवा आगामी चित्रपट याविषयी माहिती मिळावी यासाठी मी पूर्वी अपलोड केलेले फोटो,व्हिडिओज डिलीट केले होतं’,असं जान्हवीने सांगितलं.

दरम्यान, ‘धडक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर जान्हवीच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली.सध्या इन्सावर तिचे १.९ मिलियन फॉलोव्हर्स असल्याचं पाहायला मिळतं.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janhvi kapoor deleted instagram posts