गेल्या काही दिवसांपासून चौकटीबाहेरील भूमिका साकारणारी अभिनेत्री आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपची पूर्वपत्नी अभिनेत्री कल्की कोचलिन चर्चेत आहे. तिने लग्नाआधीच एका मुलीला जन्म दिला असल्यामुळे या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता कल्कीने बॉयफेंड गाय हर्शबर्गसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे चर्चा सुरु झाल्या आहेत.
कल्कीने सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो सध्या चर्चेत आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये कपल गोल्स असे म्हटले आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.
एका चाहत्याने तर तुम्ही झोपल्यावर फोटो कोणी काढला असा प्रश्न कल्कीला विचारला आहे. सध्या त्यांचा हा फोटो चर्चेत आहे.
कल्की आणि अनुराग यांचे २०११ मध्ये लग्न झाले होते. या दोघांनी बऱ्याच चित्रपटांसाठी एकत्र काम केले. अखेर २०१५ मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोटानंतरही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यानंतर बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबतचा फोटो कल्कीने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या रिलेशनशीपची अधिकृत घोषणा केली. आता कल्कीने एका बाळाला जन्म दिला आहे.