आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारा अभिनेता आणि स्वयंघोषित समीक्षक कमाल आर खान याने आता पुन्हा एक वादग्रस्त ट्विट केले आहे. हे ट्विट कोणत्याही अभिनेत्याबद्दल किंवा अभिनेत्रीबद्दल नाही तर त्याने यावेळी चक्क विराट कोहलीला लक्ष केलं आहे. अनिल कुंबळेने भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता रवी शास्त्री यांना टीम इंडियाचे प्रशिक्षक बनवण्यात येईल असे म्हटले जात आहे. या संबंधीत एका बातमीला ट्विट करत केआरकेने कोहलीवर हल्लाच चढवला.

आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीला डेट करतोय हा स्टार किड

https://twitter.com/kamaalrkhan/status/877735957058904065

केआरके म्हणाला की, कुंबळे हा खूप प्रामाणिक माणूस आहे. पण कोहलीला रवी शास्त्री प्रशिक्षक म्हणून आल्यास जास्त आनंद होईल याचं मुख्य कारण म्हणजे तेही कोहलीसारखेच भ्रष्ट आहेत. दोन दिवसांपूर्वीच अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला. असं म्हटलं जातं की, विराट आणि कुंबळे यांच्यात विस्तवही जात नव्हता. त्यामुळे वेस्ट इंडीज दौऱ्याच्या आधीच कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्रीच नवे प्रशिक्षक बनतील या बातमीवर आपले मत व्यक्त करताना केआरकेने शास्त्री आणि कोहली या दोघांनाही भ्रष्ट म्हटले आहे.

https://twitter.com/akhiles09913970/status/877740932103258112

https://twitter.com/pranjalrana25/status/877796070436118528

https://twitter.com/Jayvora13795/status/877736595335520256

https://twitter.com/digvijaay0101/status/877737462788796417

https://twitter.com/ITheNationalist/status/877737572537159680

https://twitter.com/deepakkj87/status/877758968394919936

https://twitter.com/dipankar1000/status/877737249907003392

केआरकेच्या या ट्विटवर अनेक ट्विटरकरांनी त्याची खिल्ली उडवत म्हटले की, विराट कोहलीने देशासाठी खूप काही केलं आहे. त्यामुळे कोहलीविरोधात काही बोलण्याआधी तू विचार केला पाहिजे. तर काहीजणांनी त्याच्या ट्विटवर सहमत दर्शवत पहिल्यांदा तू काही तरी योग्य लिहिलंस असं म्हटलं.