बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी बिनधास्त वक्तव्यामुळे. कंगना सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती अनेक विषयांवर सोशल मीडिया पोस्टद्वारे मत व्यक्त करते. बऱ्याचदा तिला त्यामुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. पण सध्या कंगना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर एका चाहतीचा फोटो शेअर केल्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत. या छोट्या मुलीने तिचे सोशल मीडियावर नाव ‘छोटी कंगना’ असे ठेवले आहे.

कंगनाची चाहती असलेल्या या छोट्या मुलीने इन्स्टाग्रामवर ‘छोटी कंगना’ या नावाने अकाऊंट सुरु केले आहे. तिने कंगनाची नक्कल करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या छोट्या कंगनाचा जलवा पाहून चाहते आनंदी झाले आहेत. अनेकजण तिचे कौतुक करत आहेत. या लहान मुलीचे कंगनाने देखील कौतुक केले आहे.

आणखी वाचा : ‘आज सकाळी तिने आत्महत्या केल्याचा मेसेज आला’, अनुपम खेर हळहळले

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला या छोट्या कंगनाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘ए छोटी, तू अभ्यास करतेस ना की दिवसभर हेच सर्व करत असते?’ असे कॅप्शन दिले आहे.

लवकरच कंगनाचा ‘धाकड’ हा एक स्पाय थ्रीलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती ‘अग्नि’ची भूमिका साकारणार आहे. तर अर्जून रामपाल एका खलनायकाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. नुकतील रिलीज झालेल्या ‘फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमध्ये झळकलेला ‘जेके’ म्हणजेच शारिब हाशमी सुद्धा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धाकड’ चित्रपटाच्या व्यतिरिक्त कंगनाचे ‘तेजस’, ‘थलायवी’ आणि ‘इंदिरा’ हे चित्रपट देखील रिलीज होणार आहेत.