बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या मुलाखतीनंतर सिनेसृष्टीत जणू नवीन वादळंच आले. या मुलाखतीत तिने अनेक नावांचा उल्लेख केला. या नावांमध्ये हृतिक रोशन आणि आदित्य पांचोली यांच्या नावाचा प्रामुख्याने समावेश होता. जेव्हा कंगना बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होती तेव्हा तिचे अफेअर तिच्याहून २० वर्षे मोठा असलेल्या आदित्यशी सुरू होते. आता कंगनाच्या मुलाखतीनंतर पहिल्यांदाच आदित्यचा मुलगा सूरज पांचोलीने आपल्या पित्याच्या विवाहबाह्य संबंधांवर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामाजिक कार्य करते म्हणून सोशल मीडियावर ट्रोल झाली प्रियांका चोप्रा

‘स्पॉटबॉयई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सूरज म्हणाला की, ‘बाबा आणि कंगना यांचे अफेअर जेव्हा सुरू होते तेव्हा मी १५ वर्षांचा होता. नेमके काय चालले आहे हे कळण्याएवढी त्यावेळी मला समज नव्हती. पण घरी सर्व काही ठीक नाही याचा अंदाज मला येत होता.’ सूरज पुढे म्हणाला की, ‘या सगळ्या प्रकरणाचा परिणाम माझ्या आईवर झरीना वहाबवर  होत होता. मला कळतं होतं की घरचं वातावरण पूर्वीसारखं नाहीये. आमच्यासाठी तो खूप वाईट काळ होता. अध्ययन सुमनसोबत तिचे अफेअर सुरू होईपर्यंत आमच्याकडे असेच वातावरण होते.’

आदित्यला कंगनाच्या मुलाखतीबाबद विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, ‘ती वेडी आहे. तुम्ही ती मुलाखत पाहिली का? तुम्हाला असं वाटलं नाही का की एक वेडी व्यक्ती बोलत आहे? तिची मुलाखत पाहून मला फार वाईट वाटले. ती खोटं बोलत होती, म्हणून मी न्यायालयाची मदत घेणार आहे. मी तिच्याविरोधात कायदेशीर कार्यवाई करण्याच्या विचारात आहे.’ आदित्यने पुढे सांगितले की, ‘मला दुसऱ्यांबद्दल माहित नाही, पण ती माझ्याबद्दल जे काही बोलली ते खोटे आहे. माझ्या कुटुंबावर याचा परिणाम झाला आहे. मी आणि माझी पत्नी दोघंही तिच्या विरोधात न्यायालयात जाणार आहोत.’

जिया खान आत्महत्येप्रकरणी सूरज पांचोलीचे नावही याआधी चर्चेत आले आहे. जिझाची आई राबिया यांनी जियाने आत्महत्या केली नसून तिचा खून सूरजने केल्याचा दावा केला होता. ३ जून २०१३ मध्ये जिया खानने आत्महत्या केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranauts affair with aditya pancholi devastated his family son sooraj speaks out