बॉलिवूडमध्ये सध्या कोणत्या अभिनेत्रीची सर्वांत जास्त चर्चा होत असेल तर ती म्हणजे कंगना रणौत. ती चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे ‘इंडिया टीव्ही’च्या ‘आप की अदालत’ कार्यक्रमात तिने केलेले खुलासे. तिने हृतिक रोशन, राकेश रोशन, आदित्य पांचोली आणि करण जोहरसंदर्भात बेधडक वक्तव्यं या मुलाखतीत केली. दिग्दर्शक करण जोहरशी असलेला तिचा वाद सर्वांनाच माहित आहे. घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन करणवर टीका करत त्याला ‘मूव्ही माफिया’ असंच तिने म्हटलं होतं. यासंदर्भात तिने प्रतिक्रिया दिली असता करणनेही ट्विटरवरुन तिला उत्तर दिलंय. मात्र या उत्तरानंतर करणलाच ऑनलाइन ट्रोलला सामोरं जावं लागलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करणने तुला त्याच्या चित्रपटात भूमिका दिली नाही म्हणून तू त्याला ‘मूव्ही माफिया’ म्हटलंस का?, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर कंगनाने उत्तर दिलं की, ‘मी त्यांच्यासोबत ‘उंगली’ या चित्रपटासाठी काम केलं. यामध्ये माझी दहा मिनिटांची भूमिका होती. माझ्या आयुष्यातील हा सर्वांत फ्लॉप चित्रपट होता, त्यामुळे मला आता त्यांच्याकडून कोणतेच काम नकोय.’ कंगनाने दिलेल्या या उत्तरावर करणने ट्विटरच्या माध्यमातून राग व्यक्त केला.

https://twitter.com/karanjohar/status/903990562461814784

https://twitter.com/karanjohar/status/903481825326120961

https://twitter.com/NegiTweets/status/904015809608957956

वाचा : ‘कंगनाची मुलाखत म्हणजे जणू ‘सर्कस’च!’

‘कृतघ्न लोकांच्या सत्यतेची पडताळणी व्हावी,’ असं एक ट्विट त्याने केलं. तर दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिलं की, ‘शट अप! असं तुला बोलण्याची माझी अनेकदा इच्छा झाली पण मी स्वत:ला रोखलं.’ करणने केलेल्या या ट्विट्सनंतर नेटीझन्स त्याला ट्रोल करु लागले. कंगनाची बाजू घेत अनेकांनी करणवर टीका केली. कंगनाने तर तुझ्यावर थेट निशाणा साधला, मात्र तू तिच्या नावाचाही उल्लेख करु शकत नाही आहेस, असंही नेटीझन्सनी म्हटलं. त्यामुळे कंगनाला उत्तर देणं करणला चांगलंच महागात पडलंय असं म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar faces online troll after calling kangana ranaut ungrateful