सध्या बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खानला मुलगा होणार की मुलगी याच्याच चर्चा सिनेवर्तुळात होत आहे. त्यात या ‘बेगम ऑफ पतौडी’ची अदाच काही और आहे. निवडक सिनेमे करण्याचा आणि उत्तम भूमिकांवर कार करण्याच्या तिच्या या निर्णयावर ती आजही ठाम असल्यामुळेच तिच्या चाहत्यांमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसते. त्यात तर ‘नवाब ऑफ पतौडी’ सैफ अली खानची पत्नी झाल्यापासून तिचे वर्चस्व अजूनच वाढले. सध्या गरोदर असल्यामुळे सिनेमांपासून जरी ती काहीशी दूर असली तरी प्रसूतीनंतर काही महिन्यातच पुन्हा सिनेमांच्या चित्रिकरणाला ती सुरुवात करणार आहे.
एका मुलाखतीदरम्यान बोलताना बेबो म्हणाली की,‘मी एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की, ती पूर्ण केल्याशिवाय मला शांत बसवत नाही. शांत बसून संयमाने एखादी कृती करणे माझ्या स्वभावातच नाही. मी प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे. करिअरसंदर्भात मी प्रचंड स्वाभिमानी आहे. फक्त मी माझ्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर टाकत नाही किंवा माझ्या हाताखालच्या माणसांना प्रत्येक गोष्टीची जाहिरात करा असं ओरडत नाही, म्हणून अनेकांना मी कमी महत्त्वकांक्षी आहे असं वाटतं. पण तसं काही नाही. करिअरमध्ये कोणतीही बाब अडथळा ठरु शकत नाही. ‘गरोदरपण’ हे देखील माझ्या करिअरमध्ये अडसर ठरणार नाही. उलट मी माझं गरोदरपण मस्त एन्जॉय करतेय. लोक कोणत्याही गोष्टीचा एवढा बाऊ का करतात? तेच मला कळत नाही. मी काय करावं यासाठी अनेकजण मला सल्ले देत राहतात. मी सर्वांचं ऐकून शेवटी माझ्या मनाप्रमाणेच करत असते.’
सध्या करिना तिचे गरोदरपण चांगलंच एन्जॉय करताना दिसत आहे. तिच्यासोबत तिची बहिण करिष्मा कपूर अनेक ठिकाणी फिरताना पाहायला मिळतात.