टेलिव्हिजन विश्वातील काही गाजलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे करिश्मा तन्ना. ‘लव स्कूल’, ‘नच बलिए’, ‘बिग बॉस’ यांसारख्या कार्यक्रमांतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या रोमॅंटीक भूमिकेटच्या शोधात आहे. करिश्मा लाइफ ओके वाहिनीवरी ‘नागार्जून एक योद्धा’मध्ये दिसली होती. मला माहित नाही, लोकांना नेहमी असे का वाटते? की मी चित्रपटाच्या शोधात आहे. मी छोट्या पडद्यावर काम करण्यास तयार आहे. पण यासाठी मी चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे, असे करिश्माने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले. चागंली भूमिका मिळावी ही आशा बाळगत असताना तिने कोणती भूमिका अधिक आवडेल याचे देखील स्पष्टीकरण दिले. मालिकेमध्ये भूमिका मिळाली तरी ती रोमॅंटीक असावी, असे करिश्माने म्हटले आहे. माझ्यातील अभिनय सिद्ध व्हावा अशी भूमिका असावी, असे देखील तिने स्पष्ट केले.
‘नागार्जन एक योद्धा’ या मालिकेत करिश्मा एका नागिनेच्या भूमिकेत दिसली होती. करिश्माला आता काल्पनिक कथानकातून बाहेर पडून वेगळ्या भूमिकेतून स्वत:ला सिद्ध करायचे आहे. लवकरच करिश्मा ‘बीग मेमसाब’ या रिअॅलिटी शोमध्ये नृतसमीक्षण करताना दिसणार आहे. लवकरच गृहिणींच्या नृत्याचा कार्यक्रमाचे आठवे पर्व बिग मॅजिक या वाहिनीवर सुरु होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून करिश्मा पुन्हा एकदा आपल्या जुन्या सहकाऱ्यांसोबत दिसणार आहे. संभावना सेठ आणि रेडिओमध्ये सूत्रसंचालन करणारा प्रीतम सिंह दिसणार आहेत. बिग बॉसनंतर पुन्हा एकदा ही कलाकार मंडळी एका छताखाली दिसतील.
करिश्मा तिच्या परफॉर्मन्समुळे गाजत असतानाच तिने केलेल्या एका वक्तव्यासाठी ती प्रचंड चर्चेत आली होती. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान करिश्माने ‘कास्टिंग काऊच’ बद्दलचे तिचे विचार व्यक्त केले होते.‘कास्टिंग काऊच’ आणि फिल्म इण्डस्ट्री हे समीकरण काही नवीन नाही. असे असले तरीही करिश्माच्या गौप्यस्फोटामुळे टेलिव्हिजन विश्वात खळबळ माजली होती. याशिवाय करिश्मा तन्ना याआधी तिच्या ब्रेकअपमुळेही चर्चेत आली होती. उपेन पटेलसोबत झालेल्या ब्रेकअपविषयी बोलताना ‘आमच्या नात्याचा पाया भक्कम होता, पण काही गोष्टी मनाविरुद्ध होत गेल्या. हे एक नाते सोडून लगेचच दुसऱ्या नात्यात गुंतण्याचा आमचा विचार नसला तरी या नात्यात आम्ही वेगळे होण्याचाच निर्णय घेतला आहे’, असे तिने स्पष्ट केले होते.