अभिनेत्री कतरिना कैफ सध्या आगामी ‘जग्गा जासूस’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ब्रिटीश मूळ असलेल्या या भारतीय अभिनेत्रीबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. कतरिनाच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी अनेकांना माहिती नाहीत. कतरिना कैफचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला. मोहम्मद कैफ असे तिच्या वडिलांचे नाव असून तिच्या आईचे नाव सुझेन असे आहे. कॅटला तीन मोठ्या बहिणी, तीन लहान बहिणी आणि एक भाऊ आहे. ती लहान असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. आई सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने त्यांना अनेक ठिकाणी फिरावे लागत असे. त्यामुळे कतरिनाचे शिक्षण हे ट्युशनच्या माध्यमातून घरीच झाले. भारतात येण्याआधी कतरिना आईचे आडनाव टरकोट लावत असे मात्र भारतात आल्यानंतर तिने वडिलांचे कैफ हे आडनाव लावण्यास सुरूवात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी कतरिना खूप कमी मेकअप करते आणि सौंदर्य खुलवण्यासाठी नैसर्गिक गोष्टींवर जास्त भर देते. त्यामुळे मेकअप नसतानाही तिचा चेहरा सुंदर आणि टवटवीत दिसतो. १४ वर्षांची असताना तिने सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. चित्रपटांच्या अनेक ऑफर तिच्या अभिनयासाठी नसून तर तिच्या सौंदर्यासाठी मिळाले. सुरुवातीला दागिन्यांच्या कंपनीत काम करणारी कतरिना करिअरसुद्धा त्यातच करणार होती. त्यादरम्यान एका फॅशन शोमध्ये कतरिनाला दिग्दर्शक कैजाद यांनी पाहिले आणि ‘बूम’ चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली.

वाचा : अमरनाथ हल्ल्याचा बॉलिवूड कलाकारांकडून निषेध

कतरिनाचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही. मात्र तिने प्रयत्न सोडले नाहीत. त्यानंतर तिने एका दाक्षिणात्य चित्रपटात भूमिका साकारली ज्यासाठी दाक्षिणात्य अभिनेत्रींना दिल्या जाणाऱ्या मानधनपेक्षाही अधिक मानधन कतरिनाला मिळाले. या चित्रपटानंतर कतरिनाच्या करिअरला खरी सुरुवात झाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif childhood photos first movie career and life