आपल्या आजूबाजूला अनेक जण बॉलिवूडमधील स्टार्सचे अनुकरण करताना पाहायला मिळतात. प्रामुख्याने तरुणांमध्ये याची जास्त क्रेझ असल्याचे दिसून येते. कतरिना, दीपिका, प्रियांका किंवा शाहरुख, सलमान आणि अक्षय यांसारख्या बॉलिवूड स्टार्ससारखे आपण दिसावे, असे अनेकांना वाटत असते. त्यांच्यासारखी हेअर स्टाईल, मेकअप, कपडे, ब्रेसलेट इत्यादीचा वापर करून ते बॉलिवूड स्टार्सच्या फॅशनचे अनुकरण करतात. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचादेखील खूप मोठा चाहतावर्ग आहे. दिसायला सुंदर आणि गोड स्मितहास्य असलेल्या कतरिनाने २००३ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करून अनेकांचे लक्ष वेधून घेतले. मेहनतीच्या जोरावर तिने बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिकांमध्ये स्थान प्राप्त केले. चित्रपट अथवा मॉडेलिंगमध्ये नाविण्यपूर्ण आणि अनोखे प्रयोग करण्यात कधीही संकोच केला नाही. तिच्या फॅशनेबल स्टाईलचे तर अनेक चाहते आहेत. खास करून अलीकडच्या काळात तिने चित्रपटांमधून विविध हेअरस्टाईल साकारत स्क्रीनवरील आपल्या रुपात वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला. तुम्हीदेखील ‘हेअर कट’चा विचार करत असाल तर कतरिनाची हेअर स्टाईल तुमच्या फायद्याची ठरू शकते. पाहा कतरिनाच्या काही अनोख्या हेअर स्टाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लूक १
‘फितूर’मध्ये कतरिनाने लाल रंगाची केशरचना केली होती. कतरिनाचे केस रंगविण्यासाठी निर्मात्याने ५५ लाखांचा खर्च केल्याच्या वावड्या उठल्या होत्या. नंतर स्वत: कतरिनाने याचे खंडन केले. या हेअर स्टाईलमधील कतरिना चित्रपटात कमालीची सुंदर दिसली होती.

Katrina Kaif in Fitoor
(Picture Courtesy: Indian Express)

लूक २
अनेक चित्रपटांमधून कतरिनाने ही हेअर स्टाईल साकारली आहे. कतरिनाची ही हेअर स्टाईल फ्रेश लूक देते.

Katrina Kaif
(Photo: Facebook)

लूक ३
‘बार बार देखो’ चित्रपटात शॉर्ट हेअर ठेऊन कतरिनाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या हेअर स्टाईलमध्ये ती अतिशय क्युट दिसली होती.

Katrina Kaif in Baar Baar Dekho

लूक ४
‘अजब प्रेम की गजब कहानी’ चित्रपटात तिचा हा ‘पिगटेलस्’ लूक दिसला होता.

Katrina Kaif in Ajab Prem ki Gazab Kahaani

लूक ५
‘न्यूयॉर्क’ चित्रपटात तिने हेअर स्टाइलमध्ये लाल ‘हायलाइटस्’चा वापर केला होता. तिचा हा ‘केअर फ्री फन लूक’ तिच्या चाहत्यांना चांगलाच भावला होता. चित्रपटातील तिचे काहीसे कुरळे केस आणि केसांचा रंग कॉलेजमध्ये जाणाऱ्या अनेक युवतींना हवाहवासा असा लूक आहे.

Katrina Kaif in her film New York

लूक ६
‘राजनिती’ चित्रपटातील तिचे रूपडे कतरिनाच्या या आधीच्या चित्रपटांमध्ये कधीही न अनुभवलेले असे होते. चित्रपटातील तिच्या व्यक्तीरेखेतील बदलानुसार तिच्या केशरचनेतदेखील बदल होतो. केसांचा अंबाडा बांधलेली आणि खादी साडी परिधान केलेल्या कतरिनाचा हा लूक एकदम संयमित असा होता.

Katrina Kaif in Rajneeti

लूक ७
‘युवराज’ चित्रपटात ती नव्वदच्या दशकातील इंग्रजी चित्रपटातील अभिनेत्रीसारखी दिसली होती. चित्रपटातील तिचा ‘व्हिंटेज लूक’ तिच्या ‘व्हिंटेज’ हेअर स्टाईलमुळे अधिकच खुलून दिसला होता.

Katrina Kaif in Yuvraaj (Photo: Facebook)
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif haircut and hairstyles 7 styles you can steal from the actress