माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला हा शो कायमच चर्चेत असतो. बिग बी आणि स्पर्धकांमधील संवाद पाहणे प्रेक्षकांना विशेष आवडते. पण नुकताच पार पडलेल्या एका भागामध्ये पहिल्यांदाच तांत्रिक अडचणीमुळे एक्सपर्टचा आवाज येणे बंद झाले होते. पण अमिताभ यांनी लगेच परिस्थिती सांभाळून घेतली.
कौन बनेगा करोडपती या शोमध्ये हॉट सीवर बसलेल्या स्पर्धकाला खेळ खेळताना चार लाइफलाइन देण्यात येतात. त्यातील एक म्हणजे एक्सपर्ट अॅडव्हाइस. एक्सपर्टस नेहमी स्पर्धकांना येत नसलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर देत रक्कम जिंकण्यास मदत करतात. मात्र पहिल्यांदाच असे घडले आहे की स्पर्धकाची मदत करणाऱ्या एक्सपर्टचा आवाज तांत्रिक अडचीमुळे स्पर्धकापर्यंत पोहोचू शकला नाही.
आणखी वाचा- ‘…मला थंडीपासून वाचवू शकला नाही’; बिग बींच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा
शो मध्ये विवेक कुमार हे हॉट सीवर बसले होते. त्यांना एका प्रश्नाचे उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी एक्सपर्ट अॅडव्हाइस ही लाइफलाइन वापरण्याचा निर्णय घेतला. पण एक्सपर्टला केवळ अमिताभ यांचाच आवाज ऐकू जात होता. ते पाहून बिग बींनी इशाऱ्यांनी योग्य उत्तराचा पर्याय सुचवण्यास सांगितले. शोमध्ये तांत्रिक अडचणीवर बिग बींनी मात करत शो सुरळीत पार पाडला.