काळ बदलत गेला तसं चित्रपटसृष्टीतही अनेक बदल झाले. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रींनी एखाद्या अभिनेत्यासोबत बोल्ड सीन किंवा किसिंग सीन केले की त्याची चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगायची. अनेक वेळा त्यांना ट्रोल व्हावं लागायचं. परंतु काळ बदलत गेला आणि या गोष्टी कलाविश्वामध्ये सर्रास होऊ लागल्या. चाहत्यांनाही या गोष्टींची सवय झाली. त्यामुळे आजकाल येणाऱ्या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन किंवा किसिंग सीन अभिनेत्री बिंधास्तपणे देऊ शकतात. पूर्वीच्या काळी हे सारं अवघड होतं. मात्र तरीदेखील एका अभिनेत्रीने हा सीन केला आणि त्यानंतर कलाविश्वामध्ये अभिनेत्री सर्रास आणि बिंधास्तपणे किसिंग सीन देऊ लागल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९३३ साली अभिनेत्री देविका राणी आणि हिमांशू राय यांची मुख्य भूमिका असलेला ‘कर्मा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. विशेष म्हणजे या चित्रपटातून पहिल्यांदाच किसिंग सीन देण्यास सुरुवात झाली. अभिनेत्री देविका राणी यांनी पहिला किसिंग सीन दिला. त्यामुळे बॉलिवूडमध्ये किसिंग सीन देणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या. त्यांच्या या सीननंतर चित्रपटांमध्ये किसिंग सीन देण्यास अभिनेत्री सहज तयार होऊ लागल्या.

दरम्यान, या चित्रपटातील एक किसिंग सीन हा चार मिनिटांचा होता. त्यानंतर त्यांनी ३५ वेळा किसिंग सीन दिले. हे सीन त्याकाळी सर्वात बोल्ड सीन म्हणून ओळखले गेले होते. विशेष म्हणजे देविका राणी आणि हिमांशू रॉय यांच्या या सीनची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र या सीननंतर कलाविश्वामध्ये हळूहळू बदल घडत गेल्याचं पाहायला मिळालं.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kissing on screen was okay even 80 years ago why the fuss now ssj