बॉलीवूड कलाकार कोंकणा सेनशर्मा आणि रणवीर शौरी यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पाच वर्षांपासून वैवाहिक नात्यात असणाऱ्या कोंकणा आणि रणवीर या दोघांनी सोमवारी आपापल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली. या दोघांना हारून हा चार वर्षांचा मुलगादेखील आहे.
रणवीर आणि मी दोघांनी मिळून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आम्ही एकमेकांशी असलेले मैत्रीचे नाते आणि आमच्या मुलाच्या पालकत्वाचे नाते जपणार आहोत, असे कोंकणाने ट्विटरवर म्हटले आहे. रणवीरनेही असाच संदेश आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहला आहे.