बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफची बहिण कृष्णा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या मादक फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी देखील तिने असाच एक मादक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून स्वत: टायगर देखील अवाक् झाला. त्याने यावर एक अनोखी कॉमेंट केली. त्याच्या या लक्षवेधी कॉमेंटमुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत कृष्णा लाल रंगाची बिकीनी परिधान करुन एका पूलशेजारी बसलेली दिसत आहे. “लाल रंगात मी जाड दिसते का?” असा प्रश्न तिने या व्हिडीओव्दारे आपल्या चाहत्यांना विचारला. तिच्या या प्रश्नावर ‘खूप जाड’ अशी कॉमेंट टायगरने केली. शिवाय ‘हॉट आणि फायर इमोटिकॉन’ असं म्हणत दिशा पटानीने तिचं कौतुक देखील केलं. टायगरच्या गंमतीशीर कॉमेंटमुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कृष्णा तिच्या या हटके अंदाजामुळे पहिलांदाच चर्चेचा विषय ठरली नाही तर या आधी देखील तिने काही मादक फोटो शेअर केले होते.
कृष्णाने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी तिचा चाहता वर्ग हा मोठा आहे. कृष्णा तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते. कृष्णा नेहमीच तिचा बॉयफ्रेंड एबन हॅम्ससोबत फोटो शेअर करायची मात्र काही दिवसांपुर्वी कृष्णाने बॉयफ्रेंड एबन हॅम्ससोबत ब्रेकअप झाल्याचे स्पष्ट केले आहे.