अभिनेता गोविंदा आणि कृष्णा अभिषेक या दोघांमधील कौटुंबिक वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ही मामा-भाच्याची जोडी वारंवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. गोविंदा बऱ्याचवेळा त्यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादावर बोलताना दिसतो. आता कृष्णा अभिषेकने देखील एका मुलाखतीमध्ये त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच कृष्णाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने गोविंदासोबत असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी बऱ्याच वेळा माझ्या मामा विषयी बोललो आहे. बऱ्याच वेळा मी काही बोलतो पण ते अर्धवट दाखवले जाते. ते पाहून मला वाईट वाटते. ज्या गोष्टी माझ्या हृदयाजवळ आहेत त्या मी इतरांना सांगू शकत नाही. फक्त गैरसमज होतात. छोट्या-छोट्या गोष्टी देखील चुकीच्या पद्धतीने दाखवल्या जातात. या सर्व गोष्टींमुळे आमच्यामध्ये वाद झाले आहेत’ असे कृष्णा म्हणाला आहे.

गैजरसमज झाल्यामुळे मामासोबत वाद झाला असल्याचे कृष्णा अभिषेकला वाटते. पण गोविंदाने एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, मला नाही माहिती कृष्णाकडून असे कोण करुन घेत आहे. तो केवळ विनोद करत नाही तर लोकांसमोर माझी बदनामी करतो आहे. त्याला हे सर्व करायला कोणी सांगितले असले तरी आम्हाला समोर तोच दिसत आहे.