बॉलिवूड सेलिब्रिटींना गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोल केले जातेय. सोशल मीडियावर काही अभिनेत्रींनी बिकिनीतील फोटो शेअर केल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आल्याचे दिसले. दैनंदिन आयुष्यातील फोटो शेअर करताना अभिनेत्रींना संमिश्र प्रतिक्रियांना सामोरे जावे लागते. आतापर्यंत परिणीती चोप्रा, तापसी पन्नू, क्रिती सनॉन या अभिनेत्रींवर बिकिनीतील फोटोंमुळे नेटिझन्सनी निशाणा साधला होता. यावेळेस ‘लिप्सटिक अंडर माय बुरखा’ फेम अभिनेत्री आहाना कुमरा हिने बिकिनीमधील फोटो शेअर केल्याने तिला नेटिझन्सच्या टीकेला सामोरे जावे लागतेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : आमिरने चक्क पुरस्कार सोहळ्याला लावली उपस्थिती!

आहाना सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. त्याच दरम्यान बिकिनीतील काही फोटो तिने शेअर केले. पण, त्यानंतर अगदी काही क्षणांतच तिच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडला. काही नेटिझन्सनी तर अगदी वाईट शब्दांमध्ये कमेंट्स केल्याचे दिसते. मात्र, त्याचवेळी आहानाची बाजू घेऊन बोलणाऱ्या युजरने ‘हे सौंदर्य असून फोटोशॉप केलेले नाही’, असे म्हटले.

वाचा : #LoserWaliGarbaStep तेजस्विनीची ‘लुजरवाली गरबा स्टेप’ पाहिलीत का?

दरम्यान, टीकाकारांना उत्तर देत आहानाने ‘आपण जगाला आकार देतो की, जग आपल्याला आकार देते’, असे म्हटले.

काही दिवसांपूर्वीच ‘जुडवा २’मधील अभिनेत्री तापसी पन्नूलाही याच कारणामुळे ट्रोल करण्यात आले होते. एका युजरने ‘कम से कम सोशल मीडियापे ऐसी गंदी फोटो मत अपलोड करीए, गंदी गंदी फिल्मे बना के देश की युवा पिढी को तो बरबाद कर रहे है आपलोग….’. असे त्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले होते. या प्रतिक्रियेवर चिडलेल्या तापसीने युजरला सडेतोड उत्तर देण्याचे ठरवले. त्या ट्विटला रिट्विट करत तिने लिहिलं की, ‘गंदी???? माझ्या अंगावर असलेली वाळू मी साफ करायला हवी होती, हे मला माहितीये. पुढच्या वेळी मी याची काळजी घेईन. ‘आपलोग’ म्हणणाऱ्यांसाठी.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lipstick under my burkha actor aahana kumra body shamed for wearing a bikini see her response