बॉलिवूडच्या ‘धकधक गर्ल’चं ‘बकेट लिस्ट’च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल पडलं. माधुरीच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी बरीच उत्सुकता असल्याने पहिल्या आठवड्यात चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. गेल्या शुक्रवारी म्हणजेच २५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्या तीन दिवसांत ‘बकेट लिस्ट’ने ३ कोटी ६६ लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.
४०९ स्क्रीन्सवर झळकलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ९६ लाख, दुसऱ्या दिवशी १ कोटी ३० लाख तर तिसऱ्या दिवशी १ कोटी ४० लाख रुपयांची कमाई केली.
#BucketList [Marathi] has fared well, despite #IPL affecting biz [on Fri and Sun evening]… Fri 96 lakhs, Sat 1.30 cr, Sun 1.40 cr. Total: ₹ 3.66 cr [409 screens]. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) May 28, 2018
‘बकेट लिस्ट’मध्ये माधुरीने चाळिशीतील गृहिणीची भूमिका केली आहे. सिनेमाच्या कथेत सई नावाच्या वीस वर्षीय तरुणीची कथा आहे. हृदयदान करणाऱ्या या तरुणीच्या इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार माधुरीच्या व्यक्तिरेखेने केला आहे. सईच्या इच्छा पूर्ण करताना येणाऱ्या गंमती आणि अडचणी या बकेट लिस्टमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.
वाचा : भारतीय रेल्वेच्या सुरक्षा प्रचार मोहिमेत बिग बी सहभागी
माधुरीसोबतच यामध्ये सुमित राघवन मुख्य भूमिकेत असून वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, इला भाटे, रेणुका शहाणे, दिलीप प्रभावळकर, मिलिंद फाटक अशी स्टारकास्ट आहे. तर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरही यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.