अक्षय खन्नाचा लहान भाऊ राहूल खन्ना याला बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. ‘लव्ह आज कल’, ‘रकिब’, ‘वेक अप सिद’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये राहूल झळकला होता. गेल्या काही काळात तो सिनेसृष्टीपासून काहीसा दूर असला तरी सोशल मीडियावर मात्र तो प्रचंड सक्रिय आहे.

अलिकडेच त्याने एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. हा फोटो पाहून सर्वसाधारण नेटकऱ्यांबरोबरच मलायका अरोरा देखील घायाळ झाली आहे.

राहूलने आरशासमोर उभं राहून काढलेला एक बोल्ड सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या फोटोवर “कदाचित तो स्वत:ची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहे.” अशा आशयाची कॉमेंट मलायकाने केली आहे.

मादक अदांसाठी प्रसिद्ध असलेल्या मलायकाच्या कॉमेंटमुळे हा बोल्ड सेल्फी आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राहूलच्या फिमेल चाहत्यांनी तर या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला. तर काही खोडकर नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली देखील उडवली.