जगभरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भारतातही करोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. करोना विषाणूमुळे देशभरातील वातावरण नकारात्मक झाले असून यामुळे पॅनिक अटॅक आल्याचा खुलासा अभिनेत्री मंदिरा बेदीने केला आहे. मंदिरा नुकतीच ऑस्ट्रेलियाहून परतली. ऑस्ट्रेलियाहून आल्यापासून ती स्वविलगीकरणात आहे.

मंदिरा म्हणाली, “वुमेन क्रिकेट वर्ल्ड कपसाठी मी ऑस्ट्रेलियाला गेले होते. ९ मार्च रोजी मी भारतात परतली. मी सेल्फ आयसोलेशनमध्ये होते आणि दिवसागणिक माझी चिंता वाढत होती. कारण करोना विषाणूची लक्षणं १४ दिवसांत दिसतात.” एका वेबसाइटला दिलेल्या या मुलाखतीत मंदिरा बेदी म्हणाली की इतकी घाबरलेली होती की मला अस्थमा अटॅक आला. त्याच्या एक दिवसापूर्वी तिने करोना विषाणूशी संबंधित नकारात्मक व्हिडीओ पाहिला होता. तेव्हापासून मंदिरा लोकांना अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन करत आहे. सकारात्मक गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रीत करा असं ती सांगतेय.

पाहा व्हिडीओ : दीपिकाने कतरिनावर केला चोरीचा आरोप

सोशल डिस्टन्सिंगबाबत ती पुढे सांगते, “मी, माझा मुलगा व पती व्हिडीओ कॉलद्वारे मित्रमैत्रिणींच्या संपर्कात आहोत. इतकंच नव्हे तर माझ्या आईचा वाढदिवससुद्धा आम्ही व्हिडीओ कॉलवरून साजरा केला.”