गेल्या काही दिवसांपासून ‘बालिका वधू’ मालिकेतील आनंदीची भूमिका साकारात अनेकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अविका गोर चर्चेत आहे. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या वर्षी अविका गोर आणि मनिष रायसिंघन यांच्या रिलेशनशीपबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. आता त्या दोघांचे ‘सिक्रेट चाइल्ड’ असल्याचे म्हटले जाते. त्यावर अविकाने या सर्व अफवा असल्याचे म्हटले होते. आता मनिषने देखील यावर प्रतिक्रिया देत हे सर्व धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.

नुकतीच मनिषने ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. ‘हा मूर्खपणा आहे. अविका आणि माझी खूप चांगली मैत्री आहे. आम्ही दोघे चांगले मित्रमैत्रीण असू शकत नाही का? त्यासाठी आम्हाला रिलेशनशीपमध्येच यायला हवे का? आणि हो हे खरं आहे की मी अविका पेक्षा १८ वर्षांने मोठा आहे’ असे मनिष म्हणाला.

आणखी वाचा : कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी ‘नट्टू काकां’नी घेतला मालिकेतून ब्रेक

पुढे तो म्हणाल, ‘अविका ही कायम माझी जवळची मैत्रिण राहिल. ती सध्या मिलिंद चंदवानीसोबत रिलेशनशीपमध्ये आहे आणि आनंदी आहे. मी २०२०मध्ये लग्न केले होते आणि माझ्या लग्नाला आता एक वर्षे पूर्ण झालं आहे. जेव्हा याबद्दल आम्ही ऐकले तेव्हा माझी पत्नी संगीता आणि मी हसत होतो.’

तर दुसरीकडे अविकाला आरजे सिद्धार्थ कन्ननने ‘सिक्रेट चाइल्ड’बद्दल विचारले होते. त्यावर उत्तर देत ती म्हणाली होती, “हे अशक्य आहे… आम्ही दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आहोत आणि कायम राहू… माझ्या आयुष्यात त्यांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. वयाच्या १३ वर्षापासून तो माझ्या खूप जवळचा मित्र आहे… मी त्याच्याकडून खूप काही शिकले. तो माझ्यापेक्षा १८ वर्षांनी मोठा आहे. आजूनही लोक आमच्या दोघांमधल्या नात्याबद्दल विचारत असतात. तेव्हा मी सगळ्यांना सांगते की तो माझ्या वडिलांपेक्षा थोडा लहान आहे.”