जबरदस्त अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड सिनेसृष्टीत आपली एक वेगळीच छाप पाडणारा अभिनेता मनोज बाजपेयी आता वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या वेब सिरीजचे नाव ‘द फॅमिली मॅन’ असे आहे. ही सिरीज अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर २० सप्‍टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

‘द फॅमिली मॅन’ ही श्रीकांत तिवारी नामक एका मध्यमवर्गीय माणसाची कथा आहे. हा माणूस आपल्या कुटुंबासमोर अत्यंत घाबरट असल्याचे नाटक करतो, तर दुसरीकडे तो भारतातील सर्वोत्कृष्ट गुप्तहेरांपैकी एक आहे. नॅशनल इंटॅलिजन्स एजन्सीच्या एका विशेष पथकासाठी काम करणाऱ्या श्रीकांतच्या या दुहेरी आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित ही नवी मालिका आहे. या मालिकेत मनोज बाजपेयी बरोबरच प्रियमणी, शारीब हाश्मी, शरद केळकर, नीरज माधव, गुल पनाग, सुंदीप किशन, दर्शन कुमार, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी हे कलाकार देखील दिसणार आहेत.