‘मी अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटात काम करणारा अभिनेता विजय आंदळकर दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे. तो अभिनेत्री रुपाली झंकारशी लग्न करणार आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा झाला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी साखरपुडा झाल्याचे सांगितले आहे.
रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहे. हे फोटो शेअर करत तिने, ‘पहली ही नज़र में कुछ हम कुछ तुम हो जाते हैं यूँ गुम, नैनों से बरसे रिमझिम रिमझिम हम पे प्यार का सावन, शर्म थोड़ी थोड़ी हम को आये तो नज़रे झुक जाये… सितम थोडा थोडा हम पे शोख हवा भी कर जाये..’ असे कॅप्शन दिले आहे. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : भावाच्या हत्येप्रकरणी अभिनेत्रीला अटक
विजयचे पहिले लग्न अभिनेत्री पुजा पुरंदरेशी झाले होते. पण त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेताला. पूजा सध्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे.
विजयने ‘मी अँड मिसेस सदाचारी’, ‘ढोल ताशे’, ‘702 दिक्षित’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर रुपालीने ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ या मालिकेत काम केले आहे. ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली होती.