‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अमृता पवार. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर अमृताने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आता तिचा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अमृता आता लवकरच एका नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोनी मराठीवरील ‘जिगरबाज’ या मालिकेच्या माध्यमातून अमृता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिगरबाज या मालिकेत अमृता डॉ. अदिती हे पात्र साकारत आहे. एका साध्या आणि छोट्या घरातून आलेली अदिती त्यांच्या घरातली पहिली डॉक्टर आहे. त्यामुळे आपल्या घरच्यांना आपला अभिमान वाटावा असं काम तिला करायचं आहे. मात्र, छोट्या गावातून आल्यामुळे ती थोडी भित्री असल्याचं दिसून येतं.
दरम्यान, येत्या ११ नोव्हेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अमृतासोबत अरुण नलावडे, प्रतीक्षा लोणकर यांसारखे दिगज्ज कलाकार झळकणार आहेत.