गेल्या काही दिवसांपासून विविध विमानात थेट मराठीत उद्घोषणा करण्यात येत असल्याचे व्हिडीओ समोर येताना दिसत आहेत. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही होताना पाहायला मिळत आहेत. आता नुकतंच अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्यांची भाची अदिती परांजपेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवेदिता सराफ यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ एका विमान प्रवासादरम्यानचा आहे. या व्हिडीओत त्यांची भाची आणि एका विमानाची सह-विमानचालिका अदिती परांजपे ही मराठी भाषेत उद्घोषणा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात ती “शुभ सकाळ, मी तुमची कॅप्शन अदिती परांजपे, तुम्हा सर्वांचे इंडिगोच्या वतीने आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने फ्लाईट क्रमांक ६ई५०१२ मध्ये स्वागत करत आहे”, असे ती म्हणताना दिसत आहे.
आणखी वाचा : “मला लंडनला खरेदी करता आली नाही, कारण…” प्राजक्ता माळीने सांगितला किस्सा, म्हणाली “माझे पैसे…”

त्यानंतर मग तिने या विमानाचा चालक कोण, हा प्रवास किती मिनिटांचा आहे, मदतीसाठी विमानात कोण कोण उपलब्ध आहे? शिवाय प्रवासादरम्यान प्रवाशांना कुठल्या सुविधा पुरवल्या जातील, या संदर्भातील संपूर्ण माहिती मराठीत दिली.

आणखी वाचा : मोठा स्विमिंगपूल, बेडरुमबाहेर निसर्गाचा नजारा अन्…; प्राजक्ता माळीच्या अलिशान फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का?

तिचा हा व्हिडीओ निवेदिता सराफ यांनी पोस्ट केला आहे. “कॅप्टन अदिती परांजपे मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो”, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे. या व्हिडीओवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने कमेंट करत “वाह्, वाह्…माझी मराठी”, असे म्हटले आहे. तर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी “क्या बात है”, अशी कमेंट यावर केली आहे. सध्या निवेदिता सराफ यांनी शेअर केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress nivedita saraf share flight captain used marathi language for instructions video prajakta mali comment nrp