‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुधीर फडके म्हणजेच ‘बाबुजी’ यांच्या व्यक्तिमत्वाची ख्याती जगभर पसरली आहे. त्यांची व्यायसायिक कारकीर्द आपल्यापैकी अनेकांना माहित आहे आहे. परंतु या यशामागचा त्यांचा संघर्ष, त्यांचे वैयक्तिक आयुष्य फार कमी जणांना माहित आहे. त्यांची जीवनगाथा या चित्रपटातून लोकांना पाहता येईल. नुकताच हा चित्रपट सरसंघचालक मोहन भागवत यांनी कलाकारांबरोबर पाहिला, त्यांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

मोहन भागवत म्हणाले, ”बाबुजी म्हणायचे की कोणतेही गीत गाताना भावना त्या शब्दांसोबत आल्या पाहिजेत. केवळ सूर असून चालत नाही. तेव्हा त्याचे महत्व आम्हाला तेव्हा फारसे समजले नाही. पण हा चित्रपट पाहून बाबूजींचा संगीतामागचा भाव लक्षात आला. त्यांची देशभक्ती, त्यांनी सोसलेले कष्ट पाहताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्यय येतो. ही गाणी ऐकताना पुन्हा त्याच विश्वात गेल्याचा भास होतो. उत्तम लेखन, दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट कलाकारांची निवड यामुळे हा चित्रपट एका उंचीवर गेला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी सुवर्णकाळ उभा केला असून महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना हा नक्कीच आवडेल.”

“मतभेद सर्वत्र होतात, पण…”, काजोलबरोबरच्या वादावर स्पष्टच बोलली राणी मुखर्जी; दोघींचं नातं काय? जाणून घ्या

मोहन भागवत यांनी केले ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे कौतुक

सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.