Navra Maza Navsacha 2 Collection : ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट प्रदर्शित होऊन १३ दिवस झाले आहेत. २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. १९ वर्षांपूर्वी आलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाने दमदार ओपनिंग केली आणि दोन वीकेंडला चांगली कमाई केली. आता या चित्रपटाचे १३ व्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. बुधवारी गांधी जयंतीची सुट्टी होती, त्यामुळे कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन किती, ते जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अशोक सराफ (Ashok Saraf), ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेला ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहांमध्ये आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री ४३ व्या वर्षी करतेय चौथं लग्न; बॉयफ्रेंडला गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, आधीचे तीन पती कोण?

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘नवरा माझा नवसाचा २’ ने पहिल्या दिवशी १.८५ कोटी रुपये कमावले होते. दुसऱ्या दिवशी २.५ कोटींचे कलेक्शन केले होते. तिसऱ्या दिवशी ३.७५ कोटी, चौथ्या दिवशी १.२ कोटी, पाचव्या दिवशी १.१ कोटी, सहाव्या दिवशी ९५ लाख, सातव्या दिवशी ९० लाख, आठव्या दिवशी ५५ लाख, नवव्या दिवशी १.५ कोटी, १० व्या दिवशी १.७५ कोटी, ११ व्या दिवशी ४५ लाख, १२ व्या दिवशी ५३ लाख आणि १३ व्या दिवशी चित्रपटाने ८९ लाख रुपयांची कमाई केली.

एक्स बॉयफ्रेंडचे फोटो जाळले, बॉलीवूड अभिनेत्रीने ब्रेकअपनंतर ‘असा’ काढला राग

‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने १३ दिवसांत एकूण १७.९२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्यास तो लवकरच २० कोटींचा टप्पा गाठेल. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले आहे. संवाद संतोष पवार यांचे आहेत.