भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती म्हणून ओळखली जाते. या पुरुष प्रधान संस्कृतीचा देशातील चित्रपट क्षेत्रावरही खोलवर परिणाम झाल्याचे दिसते. त्यामुळेच प्रदर्शित होणाऱ्या जवळपास प्रत्येक चित्रपटात अभिनेत्री आपल्याला दुह्यम भूमिका वठवताना दिसतात. हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्रींची भूमिका केवळ नायकाला प्रोत्साहन देणे किंवा हिरोबरोबर बागेत नाचकाम करणे या पलीकडे फारशी गेलेली दिसत नाही. परंतु अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा मर्दानी २ हा आगामी चित्रपट या ठोकळेबाज परंपरेला छेद देणारा आहे.
मर्दानी २ हा एक नायीका प्रधान चित्रपट आहे. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधील राणीने उच्चारलेला ‘अब तू किसी लड़की को हाथ लगाकर तो दिखा, तुझे इतना मारूगी कि तेरी त्वचा से तेरी उम्र का पता भी नहीं चलेगा।’ हा डायलॉग सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. तसेच या टीझरमध्ये राणी एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. मर्दानी २ मध्ये राणी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या एका माहिला पोलिस अधिकाऱ्याच्या रुपात दिसणार आहे. गोपी पुथरण यांनी मर्दानी २ चे दिग्दर्शन केले असुन येत्या डिसेंबरमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
This Navratri, good will triumph over evil. Mark the date. #Mardaani2onDecember13 #RaniMukerji #GopiPuthran @Mardaani2 pic.twitter.com/vHdmtiMrTw
— Yash Raj Films (@yrf) September 30, 2019
हा चित्रपट मर्दानी या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. देशात लहान मुलांच्या केल्या जाणाऱ्या तस्करीवर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटात राणीने केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली होती.