दिवाळी सण म्हटलं की सर्वांच्या अंगात उत्साह हा असतोच. हा उत्साह द्विगुणी करणारा दिवाळीमधील एक दिवस म्हणजे ‘भाऊबीज.’ नाते बहीण भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे. ‘भाऊबीज’ बहीण भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस मानला जातो. सामन्य माणसांपासून ते बढ्या बढ्या कलाकारांपर्यंत सर्वचजण भाऊबीज मोठ्या थाटामाटात साजरी करतात. पण ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेच्या सेटवर साजरी करण्यात आलेल्या भाऊबीजेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका चर्चेत आहे. ही मालिका टीआरपीच्या यादीमध्ये नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असते. या मालिकेतील शनाया, गुरुनाथ सुभेदार आणि राधिका सुभेदार या तीन पात्रांची केमेस्ट्री पाहण्यासारखी आहे. तसेच काही दिवसांपूर्वी मालिकेत राधिकाचा मित्र सौमित्रची एण्ट्री झाली आहे. राधिका आणि सौमित्रच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे.

आणखी वाचा : गुरुनाथ नाही तर सौमित्रची निवड करणार राधिका

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिकाचा होणारा नवरा सौमित्र नेहमी शनाया आणि गुरुनाथचा राग करत असतो. पण याच सौमित्रने त्याच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात शनायाला बहिण मानले आहे. सौमित्रने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शनाया सौमित्रला भाऊबीज करताना दिसत आहे. तसेच सौमित्रने शनायाला ५०० रुपये भेट म्हणून दिले आहेत. ओवाळणी करताना शनायाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे. सध्या त्यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mazhya navryachi bayko saumitra celebrate bhaubij with shanaya avb