‘मेड इन इंडिया’ या म्युझिक अल्बममुळे चर्चेत आलेला अभिनेता म्हणजे मिलिंद सोमण. मॉडलिंगपासून करिअरची सुरुवात करणारा मिलिंद आज त्याच्या फिटनेससाठी विशेष ओळखला जातो. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेला मिलिंद अनेक वेळा त्याचे पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो. मात्र यावेळी एक जुना फोटो शेअर करुन त्याने त्याच्या मॉडेलिंगच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मिलिंदने शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये त्याच्या या एकाच फोटोची चर्चा आहे. त्याचा हा लूक चाहत्यांना आवडला असून प्रत्येक जण मिलिंदचा हा लूक कोणाप्रमाणे दिसत असावा हे सांगत आहे. काहींच्या मते तो ‘पद्मावत’ चित्रपटातील रणवीरप्रमाणे दिसत असल्याचं म्हणत आहे. तर काहींच्या मते तो जीजसप्रमाणे भासत आहे.
अभिनेता प्रतिक बब्बरलादेखील मिलिंदचा हा लूक आवडला असून त्याने ‘ब्राऊन जीसस’ असं म्हणत मिलिंदच्या या फोटोवर कमेंट केली आहे.