फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता मिलिंद सोमण सतत काही ना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतो. समुद्रकिनाऱ्यावरील न्यूड फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करून वादात अडकलेल्या मिलिंदने आता आणखी एक नवीन फोटो पोस्ट केला आहे. नोज रिंग आणि काजळ लावलेला मिलिंदचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

चेहऱ्यावर रंग, नोज रिंग, डोळ्यांत काजळ आणि भेदक नजर.. असा हा मिलिंदचा फोटो आहे. ‘मला माहितीये की आता होळी नाहीये पण गेल्या काही दिवसांपासून मुंबईजवळ असलेल्या कर्जतमध्ये काही मजेशीर गोष्टी केल्या आहेत. लवकरच त्याबद्दल सांगेन’, असं त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. मिलिंदच्या आगामी प्रोजेक्टसाठीचं हे फोटोशूट असून त्याची घोषणा लवकरच होणार आहे. मात्र सध्या तरी मिलिंदचा हा कधीच न पाहिलेला लूक सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय.

आणखी वाचा : प्रेक्षकांची निराशा करणारी ‘लक्ष्मी’

मिलिंदने नुकताच त्याचा ५५ वा वाढदिवस साजरा केला आणि वाढदिवशीच त्याने गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावरील स्वत:चा न्यूड फोटो पोस्ट केला. या फोटोमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला असून त्याच्याविरोधात तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती.