Monalisa : प्रयागराज येथील कुंभमेळ्यातला व्हायरल झालेला चेहरा म्हणजे मोनी भोसले, अर्थात मोनालिसा. मोनालिसाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होते आहे. दरम्यान याच मोनालिसाला चित्रपट मिळाला आहे. दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी आज मोनालिसाची भेट घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिग्दर्शक सनोज मिश्रा मोनालिसाच्या भेटीला

दिग्दर्शक सनोज मिश्राने मोनालिसाची तिच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. सनोज मिश्रा यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी मोनालिसा आता द डायरी ऑफ मणिपूरमध्ये झळकणार आहे असं सांगितलं आहे. मोनालिसाशी आज मी तिच्या घरी जाऊन चर्चा केली. तिला सिनेमा करण्यासाठी साईन केलं आहे असंही सनोज मिश्रा यांनी म्हटलं आहे.

द डायरी ऑफ मणिपूर चित्रपटात काम करणार मोनालिसा

मोनालिसाच्या बरोबर उभं राहात सनोज मिश्रा यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. द डायरी ऑफ मणिपूर या सिनेमासाठी मी मोनालिसाला कास्ट केलं आहे. माझ्या पुढच्या चित्रपटात ती दिसणार आहे. मी आज त्यांना भेटायला प्रयागराजला आलो आहे. तसंच मिश्रा असंही म्हणाले की मी आज मोनालिसा अर्थात मोनी भोसले यांच्या घरच्यांनाही भेटलो. त्यांच्याशी चित्रपटाबाबत चर्चा केली.

मोनालिसाची एका वाक्यात प्रतिक्रिया

दरम्यान मोनालिसाने दिग्दर्शक सनोज मिश्रा यांचे आभार मानले आहेत. मला चित्रपट मिळाला याचं समाधान वाटतं आहे आणि आनंद वाटतो आहे असं मोनालिसाने म्हटलं आहे.

मोनालिसाचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने तिला मिळाली प्रसिद्धी

मोनिलासाचा ( Monalisa ) एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे कुंभमेळ्यात तिचीही चर्चा रंगली. मोनालिसाचं सौंदर्य खरोखरच अप्रतिम आहे. मात्र तिला फोटो काढण्यासाठी, व्हिडीओसाठी, तिच्याशी बातचीत करण्यासाठी अक्षरशः त्रास दिला जातो आहोत. मोनालिसा माळा विक्रीचं काम करते पण तिच्या या व्यवसायावरही या सगळ्यामुळे परिणाम झाला आहे. प्रयागराजमध्ये गेल्यानंतर तिला प्रसिद्धी मिळाली. पण या प्रसिद्धीचा परिणाम तिच्या पोटापाण्याच्या व्यवसायावर होतो आहे. लोक तिला पाहिलं की तिच्या मागे लागतात. तिला त्रास देतात. त्यामुळे तिची माळा विक्री राहूनच जाते. असं मोनालिसाच्या आजोबांनी सांगितलं. तिच्या सौंदर्याची भुरळ अनेकांना पडली आहे. मोनालिसा अवघ्या १६ वर्षांची आहे. तिला जी प्रसिद्धी मिळाली त्यापेक्षाही तिला उदरनिर्वाहासाठी जो व्यवसाय ती करते तो अधिक महत्त्वाचा वाटतो तिने काही दिवसांपूर्वी हे माध्यमांनाही सांगितलं आहे. मोनालिसाचं ( Monalisa ) खरं नाव मोना भोसले असं आहे. ती इंदूरची आहे. तिच्या सौंदर्याची तुलना मोनालिसाच्या सौंदर्याशी केली गेल्याने तिला कुंभमेळ्यातली मोनालिसा ( Monalisa ) असं म्हटलं गेलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monalisa news director sanoj mishra sign monalisa for his next film diary of manipur what did he say scj