‘रसोडे में कौन था’ या रोस्टेड व्हिडीओमुळे प्रकाशझोतात आलेला संगीतकार यशराज मुखाते सध्या आपल्या युट्यूब व्हिडीओजमुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याने तयार केलेल्या रोस्टेड गाण्यांवर बॉलिवूड सेलिब्रिटी देखील थिरकताना दिसत आहेत. अलिकडेच त्याने बिग बॉसमधील एका संभाषणावरुन ‘सड्डा कुत्ता टॉमी’ या गाण्याची निर्मिती केली. या विनोदी रोस्टेड गाण्यावर प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा हिने डान्स केला आहे. हा लक्षवेधी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा – सलमानमुळेच ‘या’ अभिनेत्रींना करता आलं बॉलिवूडमध्ये पादार्पण
अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा बिकिनी अवतार; हॉट फोटोशूटमुळे चाहते अवाक
आपल्या मादक अदांनी घायाळ करणारी मोनालिसा ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. नुकतेच तिने यशराज मुखातेच्या “तौडा कुत्ता टॉमी सड्डा कुत्ता कुत्ता” या रोस्टेड गाण्यावर डान्स केला. हा व्हिडीओ तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमधील तिचे हावभाव पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
अवश्य पाहा – बॅटमॅन-सुपरमॅनला विसरा; या ‘लेडी सुपरहिरो’ दाखवतायेत खरा दम
बिग बॉसच्या १३ व्या सीझनमध्ये अभिनेत्री शेहनाज गिलनं एका संभाषणादरम्यान “ठिक आहे काय करु मी आता? आत्महत्या करु का?माझ्याकडे भावना नाहीत का? तुझ्या कुत्र्याला आम्ही टॉमी म्हणायचं अन् आमच्या कुत्र्याला तू कुत्रा म्हणणार?” अशा आशयाची वाक्य उच्चारली होती. या वाक्यांना एडिट करुन यशराज मुखातेनं विनोदी पद्धतीचं गाणं तयार केलं. हे गाणं सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.